श्री साईबाबा संस्‍थानच्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्‍याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्‍याविषयी आलेल्‍या प्रस्‍तावांना दिलेले उत्तर

राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !

महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !

यापूर्वी महाराष्‍ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्‍यासाठी या एक्‍सप्रेसला ६ घंटे लागतील.

ग्रहणकाळात शिर्डीसह देशातील अनेक मंदिरे बंद असल्याने भाविक देवदर्शनास मुकले !

ग्रहणकाळात शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरे सकाळपासून बंद होती, तर काही मंदिरे दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत बंद होती.

राजकीय घोळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे विश्‍वस्त मंडळ अंतत: विसर्जित !

हिंदूंच्या मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांवर राजकीय पक्षांचे नेते अथवा प्रशासकीय अधिकारी नकोत, तर भक्तच हवेत ! यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित होणे आवश्यक आहे.

साई मंदिरात हार फुले नेण्यास अनुमति नसल्याने सुरक्षारक्षक आणि फुलविक्रेते यांच्यात धक्काबुक्की !

कोरोनाच्या संसर्गानंतर राज्यातील मंदिरांमध्ये हार-फुले नेण्यास अनुमती दिली असली तरी शिर्डी संस्थानने साई मंदिरात हार-फुले नेण्यास अद्यापही अनुमती दिलेली नाही. त्यामुळे मंदिराच्या या भूमिकेला स्थानिक विक्रेते आणि भाविक यांनी आवाहन दिले आहे.

‘माझी वसुंधरा अभियानात’ स्वच्छतेत शिर्डीचे साई मंदिर प्रथम क्रमांकावर, तर पंढरपूर दुसऱ्या क्रमांकावर !

देशभरातून लाखो भाविक प्रतिवर्षी शिर्डीत येतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायतीसमोरील मोठे आव्हान आहे.

साईबाबा आणि शनि शिंगणापूर मंदिरातील ध्वनीवर्धकावरील आरती बंद !

जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरावरील वर्षांनुवर्षे चालू असलेली रात्रीची शेजारती, तसेच पहाटेची काकड आरतीही ध्वनीवर्धकावरून बंद करण्यात आली. शनी शिंगणापूर देवस्थाननेही ध्वनीवर्धकावरील काकड आरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

साईबाबा संस्थानच्या दानपेटीत चलनातून बाद केलेल्या ३ कोटी रुपयांच्या नोटा आढळल्या

नोटाबंदीला ५ वर्षे उलटली, तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही. ‘यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे; मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही़.

विदेशी चलनाचे वेळेत नूतनीकरण न केल्याने शिर्डी येथील साई संस्थानचे खाते गोठवले !

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत काम करणार्‍या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते. खाती गोठवल्याने साहाय्याचा ओघ थांबला आहे.