शिर्डी – श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्या साई दरबारात जात-धर्म मानले जात नाहीत; मात्र सध्या काही लोक साईबाबांना विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. साई संस्थानने एका विशिष्ट समुदायाला मोठी रक्कम दान दिल्याचा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यामुळे साई संस्थानाच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवणार्या लोकांविरोधात कडक पावले उचलली असून संस्थानची अपकीर्ती करणार्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
( सौजन्य : tv9 DIGITAL )
तेलंगाणा राज्यातही अशा प्रकारे चुकीचा संदेश प्रसारित झाल्याची तक्रार साईभक्तांनी केली आहे. त्याअन्वये शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम २९५, १५३ ए आणि ५०० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून शिर्डी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.