मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप !
शिर्डी (अहिल्यानगर) – अभिनेते शाहरूख खान आणि त्याच्या कुटुंबियांनी शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यामुळे मुसलमान कट्टरतावाद्यांनी त्यांना लक्ष्य करत शिवीगाळ केली. शाहरूख खान यांनी त्यांची मुलगी सुहाना हिच्यासमवेत श्री साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या आगामी प्रदर्शित होणार्या ‘डंकी’ या चित्रपटासाठी प्रार्थना केली. खान आणि त्यांच्या मुलीचे श्री साईबाबांच्या मंदिरात प्रार्थना करतांनाचे दृश्य सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर धर्मांधांनी टि्वटरवर शाहरूख खान मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप करत त्यांना ‘काफिर’ संबोधून घृणास्पद टिप्पणी केली.
सौजन्य लाईव हिंदुस्थान
एका टि्वटर वापरकर्त्याने म्हटले की, शाहरूख खान मुसलमान नाही. त्याने अल्लाहवर विश्वास ठेवला असता, तर त्याने कधीही मंदिरात जाऊन प्रार्थना केली नसती. इस्लामिक धर्मग्रंथानुसार, मुसलमानांना मूर्तीपूजा करण्यास मनाई आहे आणि मूर्तीपूजा करणे, हे पाप मानले जाते. इस्लाममध्ये ते निषिद्ध आहे.
संपादकीय भूमिकाहाच आहे का अशांचा सर्वधर्मसमभाव ? कित्येक हिंदू दर्ग्यात जाऊन चादर चढवतात, त्या वेळी हिंदू त्यांच्या विरोधात बोलत नाहीत; मात्र धर्मांधांना कुठला मुसलमान हिंदूंच्या मंदिरात गेलेला चालत नाही ! यातून ‘सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळायचा’, असेच झाले आहे. याविषयी पुरो(अधो)गामी काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |