शेतकर्‍याचे कष्ट लक्षात येण्यासाठी एकदा तरी घरी लागवड करून पहा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘जेव्हा आपण स्वतः भाजीपाला पिकवतो, तेव्हा ‘एखादी भाजी तोडणीसाठी सिद्ध होईपर्यंत किती कालावधी लागतो ? या कालावधीमध्ये रोपाची कशा प्रकारे काळजी घेतली जाते ?’, अशा सर्व कष्टांची आपल्याला जाणीव होते. यामुळे ‘शेतकरी शेतात किती परिश्रम करत असेल ?’, याची कल्पना येऊन प्रतिदिन ताटात वाढल्या जाणार्‍या अन्नाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. आपोआपच आपल्याकडून अन्न वाया घालवले जात नाही.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (६.१०.२०२२)