मातीतील सूक्ष्म जिवाणूंचे महत्त्व

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

कोणतेही झाड त्याच्या मुळांवाटे अन्नद्रव्ये शोषून घेते. ही अन्नद्रव्ये मातीत असतात. असे असले, तरी मातीतील अन्नद्रव्ये झाडाला मिळण्यासाठी काही सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते. झाडांसाठी नत्र (नायट्रोजन) अतिशय आवश्यक असते. हवेमध्ये नत्र अधिक प्रमाणात असते; परंतु झाडे हवेतून नत्र घेऊ शकत नाहीत. झाडे मातीतूनच नत्र घेऊ शकतात. झाडांना आवश्यक असलेले नत्र मातीमध्ये उपलब्ध होण्यासाठीसुद्धा काही जिवाणूंची आवश्यकता असते. जिवाणूंच्या कार्यावर झाडांचे पोषण अवलंबून असते. या जिवाणूंचे कार्य जेवढे चांगले होईल, तेवढी झाडाला अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात प्राप्त होतात. ज्याप्रमाणे घरामध्ये डाळ, तांदूळ असे सर्व आहे; परंतु ते शिजवलेच नाही, तर आपण जेवू शकणार नाही. त्याचप्रमाणे झाडासाठी आवश्यक असलेले मातीतील आणि हवेतील सर्व घटक मुळांना शोषून घेता येतील, अशा स्वरूपात परिवर्तित करून पुरवण्याचे कार्य जिवाणू करतात. भूमीतील जिवाणूंची संख्या आणि कार्य जितके अधिक, तितकी मातीची सुपिकता अधिक असते.

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (७.११.२०२२)