नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

अपप्रचार : ‘नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न अधिक येत नाही.
खंडण : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत पूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील त्यांच्या गुरुकुलाच्या ९० एकर शेतामध्ये रासायनिक शेती करत असत. नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजल्यावर जेव्हा त्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेती चालू केली, तेव्हा पहिल्याच वर्षी त्यांना रासायनिक शेतीद्वारे मिळत होते तेवढेच उत्पन्न मिळाले. ते अल्प झाले नाही. पुढील वर्षी माती अधिक सुपीक झाल्यावर रासायनिक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे आधीपेक्षा उत्पन्नात वाढ झाली. त्यांच्या मातीच्या सुपिकतेतही वाढ झाली. असा दुहेरी लाभ मिळवणार्‍या अनेक शेतकर्‍यांची उदाहरणे भारतभरात आहेत.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१९.९.२०२२)