झेंडूच्या रोपांची लागवड करण्याचे महत्त्व

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

‘झेंडूची रोपे नैसर्गिक शेतीमध्ये पुष्कळ महत्त्वाची भूमिका बजावतात.

सौ. राघवी कोनेकर

१. झेंडूची पाने आणि फुले लागवडीची शोभा वाढवण्यासह अनेक मित्रकीटके आणि मधमाश्या यांना आकर्षित करतात. ‘एका फुलावरील परागकण दुसर्‍या फुलावर पडणे’, याला ‘परागसिंचन’ म्हणतात. फलधारणा होण्यासाठी परागसिंचन आवश्यक असते. झेंडूच्या फुलांकडे आकर्षित होणार्‍या किटकांमुळे परागसिंचनाचे कार्य होऊन उत्पादन वाढण्यास साहाय्य होते.

२. काही वेळा वांगी, कोबी अशा भाज्यांच्या मुळांवर लहान गाठी दिसतात. या सूत्रकृमींच्या (‘Nematodes’च्या) गाठी असतात. हे कृमी भाज्यांच्या मुळांतून रस शोषून रोपाला हानी पोचवतात. या कृमींचा नाश करणारे १ औषधीतत्त्व झेंडूच्या मुळांमधून स्रवते आणि सूत्रकृमींचे नियंत्रण करते. त्यामुळे प्रत्येक वाफ्यात किंवा मोठ्या पिशवीमध्ये (ग्रो-बॅगमध्ये) अन्य भाजीपाल्या समवेत झेंडूची लागवड अवश्य करावी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (६.१०.२०२२)