लागवडीमध्‍ये भाजीपाल्‍याच्‍या समवेत फुलझाडेही असणे आवश्‍यक आहे !

आपल्‍या घरच्‍या लागवडीमध्‍ये फळे आणि भाजीपाला यांच्‍या समवेत फुलझाडांचीही लागवड करणे आवश्‍यक आहे. फुलझाडे लागवडीची शोभा वाढवतात.

बियांवर बीजामृताचे संस्‍कार का करावेत ?

‘बिया पेरण्‍यापूर्वी त्‍यांवर बीजसंस्‍कार करणे आवश्‍यक असते. बीजसंस्‍कार करण्‍यासाठी बीजामृताचा उपयोग करतात. बीजसंस्‍कारांमुळे पुढील लाभ होतात.

रासायनिक शेती केवळ मानवी आरोग्याची नाही, तर निसर्गाचीही मोठी हानी करते !

‘रासायनिक शेतीतील पिके मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेतच; परंतु ही रसायने शेतातील अनेक सूक्ष्म जीव-जंतू, पाणी आणि हवा यांचीही हानी करतात. रसायनांच्या सततच्या वापराने मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू मरतात आणि भूमीची सुपीकता घटत जाऊन ती नापीक होते.

वेलवर्गीय भाज्यांसाठी मोठ्या आकाराची कुंडी किंवा वाफा अधिक योग्य !

सर्व वेल जसे वरच्या दिशेने पसरतात, तशी त्यांची मुळे भूमीखाली पुष्कळ प्रमाणात आडवी पसरतात. त्यामुळे लहान आकाराच्या कुंडीत वेलवर्गीय भाज्यांची वाढ चांगली होऊ शकत नाही.

रोपांवर जीवामृत आणि ताक यांची एकत्रित फवारणी करण्‍याचे लाभ

जीवामृत आणि आंबट ताक मिसळून त्‍याची सर्व रोपांवर फवारणी करावी. फवारणीसाठी तुषार सिंचनाच्‍या (स्‍प्रेच्‍या) बाटलीचा उपयोग करावा. या फवारणीमुळे होणारे लाभ देत आहोत . . .

लागवडीच्या कामांत घरातील सर्वांचा सहभाग असावा !

असे केल्याने ‘एखादी भाजी ताटात येण्याआधी ती कशी लावली जाते ? ती किती कालावधीने सिद्ध होते ?’, असे अनेक बारकावे सर्वांच्या लक्षात येतात. सर्वांनी कष्ट करून पिकवलेला भाजीपाला खातांना निराळेच समाधान मिळते.

वेलवर्गीय भाज्‍यांची उत्तम वाढ होण्‍याकरता वेलीसाठी मांडव करावा !

वेलवर्गीय भाज्‍या लावल्‍यावर त्‍यांची उत्तम वाढ होण्‍यासाठी वेल उंचावर चढवणे आवश्‍यक असते. मांडव केल्‍यास वेल व्‍यवस्‍थित पसरून तिला अनेक फांद्या येतात आणि परिणामी अधिक उत्‍पन्‍न मिळते.

रोपांवर अल्‍प प्रमाणात लागलेली कीड केवळ पाण्‍याच्‍या फवार्‍याने धुवून घालवावी !

‘रोपांवर मावा, पांढरी माशी अशा किडींचा संसर्ग अल्‍प प्रमाणात असतांनाच पाण्‍याच्‍या फवार्‍याने रोपाचा तो भाग धुवून टाकावा. यासाठी तुषार सिंचनाच्‍या (‘स्‍प्रे’च्‍या) बाटलीचा उपयोग करावा. मावा अगदीच चिकट असेल, तर दात घासण्‍याच्‍या जुन्‍या ब्रशने (टूथ ब्रशने) घासून तो काढून टाकावा.

कुंडीतील मुंग्‍या घालवण्‍याचा सोपा उपाय !

मुंग्‍या हा निसर्गाच्‍या अन्‍नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन शक्‍यतो विषारी औषधे घालून त्‍यांना मारू नये. हळद, कापूर, दालचिनी यांपैकी जी पूड घरात उपलब्‍ध असेल, ती साधारण १ – २ चहाचे चमचे कुंडीत आणि कुंडीखाली पसरून घालावी. या पदार्थांच्‍या उग्र वासाने मुंग्‍या निघून जातात.

प्रतिदिन स्‍वयंपाकात फोडणी करतांना लागणारे घटक स्‍वतःच्‍या लागवडीत पिकवा !

प्रतिदिन स्‍वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्‍या मिरच्‍या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात…..