घरी स्‍वतः पिकवलेला भाजीपाला म्‍हणजे औषधच !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६६

सौ. राघवी कोनेकर

‘केवळ धान्‍य आणि भाजीपाला यांतूनच हानीकारक रसायने आपल्‍या पोटात जातात, असे नाही, तर सध्‍या पेठेमध्‍ये (बाजारात) मिळणार्‍या सर्वच अन्‍नपदार्थांमध्‍ये काही ना काही हानीकारक कृत्रिम पदार्थ, रंग, प्रिझरव्‍हेटीव असे घातलेले असतेच. त्‍यामुळे खरेतर ‘आहार हेच औषध’, असे म्‍हणणे सध्‍या कठीणच वाटते; परंतु आपल्‍या घरच्‍या लागवडीत पिकवलेला विषमुक्‍त भाजीपाला मात्र निश्‍चितपणे औषधाचे काम करू शकतो. आजपासूनच आपल्‍या नित्‍य आहारातील न्‍यूनतम काही गोष्‍टी तरी स्‍वतःच पिकवण्‍यासाठी कृतीशील होऊया.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.०१.२०२२)