सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७१
‘सदनिकेमध्ये (फ्लॅटमध्ये) निरनिराळ्या खोल्यांच्या खिडक्यांमध्ये दिवसभरात अल्प-अधिक प्रमाणात ऊन येते. निरनिराळ्या रोपांना असलेली उन्हाची आवश्यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.
अल्प ऊन आवश्यक असलेली रोपे कडक उन्हात राहिल्यास करपून जातात. कोणत्या भाजीपाल्याला किती ऊन आवश्यक आहे, या विषयीचा विस्तृत लेख सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याची मार्गिका (लिंक) खाली दिली आहे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.०१.२०२३)
भाज्यांची उन्हाची आवश्यकता समजून घेण्यासाठी मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/84816.html
आपले लागवडीसंदर्भातील अनुभव आम्हाला कळवा ! |