सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७०
‘फेब्रुवारी ते एप्रिल हा पुदिना लागवडीसाठी उत्तम कालावधी आहे, तसेच पुढे पावसाळ्यातही याची लागवड करता येते. बियाण्यांच्या दुकानात पुदिन्याच्या बिया मिळतात; परंतु घरगुती लागवडीसाठी याच्या काड्यांपासून लागवड करणे अधिक सोपे जाते. हे अल्प व्ययातही होते.
‘ही लागवड कशी करावी ?’, याविषयीचा विस्तृत लेख आणि माहितीपट सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याची मार्गिका (लिंक) खाली दिली आहे. पुदिन्याची लागवड सोपी असल्याने घरातील लहान मुलांकडून ती करवून घेतल्यास त्यांनाही लागवडीविषयी आवड निर्माण होईल. उन्हाळ्याच्या काळात थंडावा देणारा पुदिना घरीच उपलब्ध असेल, तर त्याच्या ताज्या पानांचा स्वयंपाकात आणि अनेक घरगुती औषधांत उपयोग करता येतो. त्यामुळे कुंडीत पुदिना लागवड अवश्य करावी.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.०१.२०२२)
♦ पुदिना लागवड समजून घेण्यासाठी मार्गिका ♦
https://www.sanatan.org/mr/a/85250.html