सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६९
‘झाडांवर, तसेच मातीत विविध प्रकारचे कीटक बघायला मिळतात. यांमध्ये अनेक प्रकारच्या माश्या, कोळी, पतंग, अळ्या, मुंग्या इत्यादींचा समावेश असतो. कीटक दिसल्यावर प्रत्येक वेळी ‘त्यांना घालवण्यासाठी काय फवारावे ?’, असा विचार करू नये. काही कीटक हे ‘मित्र कीटक’ असतात. हे अनेक हानी करणार्या किटकांना, तसेच त्यांच्या अंड्यांना खाऊन संपवतात. सुरवंट काही झाडांची पुष्कळ पाने खाऊन कोषांत जातात; पण पुढे त्यांपासून बनणारी फुलपाखरे परागीभवनासाठी साहाय्य करतात.
‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ म्हणजे ‘एक जीव दुसर्या जिवाचे जीवन आहे’, या न्यायाने ‘निसर्गात प्रत्येक जिवाला काहीतरी कार्य सोपवलेले आहे’, हे लक्षात घ्यायला हवे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.१.२०२३)