पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा येथे भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त : महानगरपालिकेचे दुर्लक्ष !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सर्वत्रच्या भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

एस्.टी. महामंडळ तोट्यातून बाहेर ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ

‘एस्.टी. कुठे आहे ?’ हे दाखवणारे ‘अ‍ॅप’ महिन्याभरात कार्यान्वित होणार !
एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची दैनिक ‘सनातन प्रभात’ला विशेष मुलाखत !

#Exclusive : दीड वर्ष निवड आणि छाननी समितीच्या बैठका झाल्याच नाहीत !

‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार देण्याविषयीच्या सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेचे आणखी काही प्रकार उघड झाले आहेत. या पुरस्काराच्या निवडीसाठी सरकारने नेमलेल्या छाननी आणि निवड समित्यांच्या बैठका मागील दीड वर्षात झालेल्याच नाहीत, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.

#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !

#Exclusive : ५ वर्षांत तिकिटात सवलत दिलेल्या प्रवाशांची नोंद न ठेवल्याने एस्.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड !

‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !

#Exclusive : महाराष्ट्र सरकारच्या थकबाकीमुळेच महावितरण तोट्यात !

वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत कृषी पंपांची थकबाकी न भरलेल्या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महावितरणची थकबाकी ४४ सहस्र ८२५ कोटी रुपयांपर्यंत वाढली.

औरंगजेबाचे महिमा मंडन करणार्‍यांना सोडणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

‘लव्ह जिहाद’, फसवून विवाह करणे याविषयी इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी योग्य कायदा अस्तित्वात आणू. मशिदींवरील भोंग्यांविषयीचे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या निर्देशांचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

वृक्षलागवडीचा चौकशी अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करा !

राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवडीचा अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात यावा, यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी विधासनभेत या समितीच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

राज्यातील मंदिरांचा आढावा घेण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या नावाने योजना चालू करू ! – गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

राज्यातील सर्व मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीव निधी देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.