सकल हिंदु समाजाची मागणी
सातारा, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – पाटण तालुक्यातील मोरगिरी भागातील पेठ शिवापूर येथे अनधिकृतपणे मदरशाचे बांधकाम चालू करण्यात आले आहे. या अनधिकृत मदरशाला सकल हिंदु समाजाचा प्रखर विरोध आहे. या बांधकामाची चौकशी करून मदरसा भूईसपाट करण्यात यावा, अशी मागणी सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. पेठ शिवापूर येथे गट क्रमांक ५२/२ मध्ये सहस्रो परप्रांतीय युवकांसाठी मदरशाचे अनधिकृत बांधकाम चालू आहे. याला ‘मदरसा मदिनतुला उलुम मोरगिरी’, असे नाव देण्यात आले आहे. पेठ शिवापूर येथील स्थानिक मुसलमान समाजाची लोकसंख्या पहाता बांधण्यात येत असलेला मदरसा, ही धोक्याची घंटा आहे. अगदी कराडपर्यंत आतंकवादी कारवायांचे जाळे आढळून आले आहे. त्यामुळे भविष्यात पाटण तालुक्यातील युवक देशविरोधी कारवायांमध्ये भरडला जाऊ शकतो.
२. पेठ शिवापूर येथील मदरशाच परराज्यातून युवक शिकण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे अकारण येथील देशभक्त मुसलमान युवक आणि हिंदू यांच्यात संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. घटनेने प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार दिला आहे; मात्र ते शिक्षण म्हणजे भारतीय शिक्षण होय. मदरशातून मिळणारे शिक्षण हे शरीयत शिक्षण असून ते समाजासाठी घातक आहे. ‘एवढा मोठा मदरसा बांधून मोरगिरी विभागातील मुसलमान समाज शिक्षणव्यवस्थेची पायमल्ली का करत आहे ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३. या अनधिकृत मदरशाचे बांधकाम महसूल विभागाची कोणतीही अनुमती न घेता वर्ष २०१७ मध्ये चालू झाले. सध्या मदरशात १०० ते १५० मुले शिकत आहेत. त्यांच्याकडून परिसरातील मुली आणि युवती यांना त्रास होत आहे. रस्त्यावरून जात असतांना त्यांच्याकडे बघत रहाणे, त्यांना वाईट शब्द उच्चारणे, जोरजोरात हसणे असे नित्याने होत आहे; मात्र भितीमुळे मुली आणि युवती हा प्रकार पालकांना सांगण्याचे टाळत आहेत. यामुळे मुलींची घुसमट होत असून ज्या पालकांच्या हा प्रकार लक्षात येत आहे, ते पालक याविषयी भयभीत आहेत.
४. काही मासांपूर्वी मदरशाच्या परिसरामध्ये रहाणार्या एका मुसलमान युवकाने मद्यप्राशन करून नशेतच एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण केली होती. तेव्हा सकल हिंदु समाजाने पाटण तालुक्यात मोठा मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला होता. मोरगिरी विभागातील मोरगिरी, कोकीसरे, वाडी कोतवडे, आंब्रज, माणगाव, नेरळे, गोकुळ आदी ग्रामपंचायतींनीही ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन या अनधिकृत मदरशाच्या बांधकामाला प्रखर विरोध दर्शवला आहे.
सकल हिंदु समाजाच्या अन्य मागण्या…
१. मदरसाच्या बांधकामाविषयी अनुमती मागणी अर्ज आल्यास सकल हिंदु समाजाचे म्हणणे विचारात घेतल्याविना कोणतीही अनुमती देण्यात येऊ नये.
२. कोणत्याही राजकीय दबावाला प्रशासनाने बळी न पडता अनधिकृत बांधकामाचे समर्थन करू नये. अनधिकृत मदरशाची चौकशी करून सकल हिंदु समाजाला न्याय द्यावा.
प्रतिक्रिया :
प्रशासनाने कारवाई न केल्यास सकल हिंदु समाजाच्या वतीने मदरसा भूईसपाट करण्यात येईल !
गत वर्षभरापासून पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागातील सकल हिंदू समाज या अनधिकृत मदरशाच्या विरोधात लढा देत आहे. ‘मदरसा मदिनतुला उलुम मोरगिरी’ हा मदरसा ५ गुंठे परिसरात उभारण्यात आला असून १५ फूट खोल तळघर आणि पहिल्या मजल्याचा ‘स्लॅब’ (छताचे बांधकाम) पूर्ण झाला आहे. गावातील एका पुढार्याने ही ५ गुंठे जागा मदरसा बांधण्यासाठी अर्पण केली आहे. पेठ शिवापूरचे सरपंच, उपसरपंच आणि बहुतांश ग्रामपंचायत सदस्य मुसलमान असल्यामुळे मदरशाला विरोध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे ग्रामपंचायत सदस्य हिंदू आहेत, ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे मदरशाचे एवढे बांधकाम विनाअडथळा झाले आहे. हा मदरसा अनधिकृत असल्याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तरी प्रशासनाने तातडीने याविषयी कार्यवाही करून हा मदरसा भूईसपाट करावा. अन्यथा सकल हिंदु समाजाच्या वतीने मदरसा भूईसपाट करण्यात येईल. याला सर्वस्वी उत्तरदायी जिल्हा प्रशासन राहील. – श्री. पवन तिकुडवे-पाटील, शिंदेवाडी, मोरगिरी विभाग, ता. पाटण, जिल्हा सातारा
मदरशात शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी द्वेषमूलक दृष्टीने हिंदूंकडे पहातो ! मदरशामध्ये मुसलमान समाजाची मुले धर्मांध होतील, असे शिक्षण दिले जाते. ‘हिंदू काफिर आहेत आणि हिंदूंना हालहाल करून मारले पाहिजे’, या पद्धतीचे शिक्षण मदरशात दिले जाते. केवळ पेठ शिवापूर येथीलच नाही, तर संपूर्ण भारतामधील मदरसे बंद करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत; कारण या ठिकाणांहूनच हमाससारख्या संघटनांना पाठिंबा दिला जात असल्याचे उघड झाले आहे. अशाच मदरशांमध्ये आतंकवादी बनण्याचे शिक्षण दिले जात असावे. तसेच तेथील प्रशिक्षणार्थ्यांना शस्त्रांचेही शिक्षण दिले जात असावे. त्यामुळे मदरशात शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी द्वेषमूलक दृष्टीने हिंदूंकडे पहातो. एक शत्रू म्हणून हिंदूंकडे पहातो. – श्री. विजय गाढवे, सातारा जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? अनधिकृत मदरशाचे बांधकाम चालू असतांना प्रशासन झोपले होते का ? |