साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके !

लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या आणि नामस्मरण करत जीवनयात्रा संपवणार्‍या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. श्रीमती नलंदा खाडयेआजी (वय ८१ वर्षे) !

२६.५.२०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय यांचा उत्स्फूर्त सहभाग

ध्येय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज

अधिवेशनामध्ये सोलापूर येथील दैनिक ‘अग्रणी वार्ता’चे संपादक आणि ‘वन्दे मातरम्’ पत्रकार कक्षाचे अध्यक्ष श्री. योगेश तुरेराव यांनी ‘हलाल जिहादसारखे ज्वलंत विषय प्रसार माध्यमे का हाताळत नाहीत ?’ या विषयी संबोधित केले.

लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु  (कु.) स्वाती खाडये

‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीमधील अडचणींविषयी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा आणि समाजासमोर ते मांडा.’

हिंदुत्वाची मशाल प्रत्येक हिंदूच्या मनात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करू ! – धर्मप्रेमींचा निश्‍चय

ही कार्यशाळा म्हणजे हिंदुत्वाचे एक धगधगते अग्नीकुंड असून या अग्नीकुंडातून आमच्या मनात प्रज्वलित झालेल्या हिंदुत्वाच्या मशालीने आम्ही पुढील काळात आपापल्या भागातील हिंदूंच्या मनात हिंदुत्वाच्या मशाली प्रज्वलीत करू.

साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होतात ! – सद्गुरु स्वाती खाडये

आज हिंदूंचे धर्मांतर होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

पुणे येथे साधना सत्संग शिबिर उत्साही वातावरणात पार पडले !

२०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला शिबिराचा लाभ ! पुणे, ९ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने पुणे शहर, भोर शिरवळ या भागांतील जिज्ञासूंसाठी ९ एप्रिल या दिवशी साधना सत्संग शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला २०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. शिबिराच्या प्रारंभी श्री. विजय चौधरी यांनी शंखनाद केला. श्री. सम्राट देशपांडे, सुश्री उज्ज्वला … Read more

व्यष्टी आणि समष्टी साधना चिकाटीने करणार्‍या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील कु. शीतल पवार (वय ३५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११३ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी एका अनौपचारिक सत्संगात दिली. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी कु. शीतल यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला.

धर्मकार्याची तळमळ असलेले कोल्हापूर येथील धर्मप्रेमी पुरुषोत्तम राजाभाई पटेल (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कोल्हापूर येथील धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम राजाभाई पटेल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे घोषित करण्यात आले. ही घोषणा सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी २९ मार्च २०२२ या दिवशी एका सत्संगात केली.