रक्षाबंधनाप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशीही बेस्ट कर्मचारी संप करणार !

बोनस घोषित न झाल्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला बेस्ट कर्मचार्‍यांनी १ दिवसाचा संप पुकारला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीही आपल्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचार्‍यांनी संप केला होता.

‘बेस्ट’चे भाडे वाढण्याची शक्यता

बेस्ट प्रशासनाचा बसभाडे आणि पास यांची दरवाढ करण्याचा विचार आहे. येत्या आर्थिक वर्षांपासून प्रवाशांना बेस्ट प्रवासाकरिता १ ते १२ रुपये, तर मासिक पाससाठी ४० ते ३५० रुपये अधिक मोजावे लागण्याची शक्यता आहे.

१४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीत एस्टी महामंडळाकडून भाडेवाढ

दिवाळीत एस्टीच्या दरात भाडेवाढ करण्यात आल्याने १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांना जास्त भाडे द्यावे लागेल. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये ही वाढ १० ते २० टक्के एवढी करण्यात आली आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमांचे पालन न करणार्‍या रिक्शाचालकांवर कारवाई

शहर रिक्शाचालकांकडून जास्त भाडे घेणे, जास्त प्रवासी वाहतूक आणि भाडे नाकारणे यांसारख्या प्रकारांसह वाहतुकीच्या नियमांचेही पालन केले जात नाही,

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now