पणजी, ४ जुलै (वार्ता.) – कदंब बसगाड्यांवर असलेली ‘विमल’ पान मसाल्याची विज्ञापने काढण्याचा आदेश कदंब महामंडळाने विज्ञापनाचा ठेका असलेल्या कंत्राटदाराला दिला आहे. चालू मासापर्यंत संबंधित विज्ञापने काढावीत, अन्यथा महामंडळ स्वत: ही विज्ञापने बसगाड्यांवरून काढेल, असे महामंडळाने ठेकेदाराला कळवले आहे.
कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे म्हणाले, ‘‘कंत्राटदाराने एकूण ३०० बसगाड्यांवरील विज्ञापनाचे कंत्राट ३ वर्षांसाठी घेतले होते. या ३०० मधील ८० बसगाड्यांवर ‘विमल’ पानमसाल्याची विज्ञापने आहेत. या जागी दुसरे विज्ञापन घालण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहे. चालू मासाच्या आत बसगाड्यांवरील ‘विमल’ची सर्व विज्ञापने काढण्यात येणार आहेत.’’ कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.
हे ही वाचा –
♦ गोवा : कदंब महामंडळाच्या बसवर असलेल्या गुटख्याच्या विज्ञापनांना ३५० शिक्षकांचा आक्षेप !
https://sanatanprabhat.org/marathi/697123.html