पणजी, १९ नोव्हेंबर (वार्ता.) : कदंब महामंडळाने वर्ष २०१६ ते २०२२ या कालावधीत प्रवाशांकडून ७ – ८ लाख रुपये दंड स्वरूपात गोळा केले आहेत, तसेच याच कालावधीत बस कंडक्टरकडून सुमारे १० लाख रुपये दंड गोळा केला आहे. काम योग्य प्रकारे करत नसल्याने महामंडळ प्रतिमास २ – ३ बस बसवाहकांना सेवेतून निलंबित करते, अशी माहिती कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक एस्.एल्. घाटे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘तिकिटाविना प्रवास करणार्याला तिकिटाच्या १० पटींनी अधिक दंड आकारला जातो.’’
संपादकीय भूमिकादंड न भरणारे प्रवासी आणि तिकीट न देता पैसे स्वतःच्या खिशात घालणारे बसवाहक पहाता माणूस नैतिकदृष्ट्या किती अधोगतीला गेला आहे, ते दिसून येते ! |