नागरिकांनी मध्यस्थांकडे (एजंट) जावे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन सेवा किचकट केल्या का ? – माजी परिवहन आयुक्त महेश झगडे

वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी वारंवार समोर येत आहे.

नोंदणी न करता ग्राहकांना वाहने दिल्यास कारवाई होणार !

बर्‍याचदा वाहन विक्रेते ग्राहकांच्या दबावाला बळी पडून वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न होताच वाहन ग्राहकाच्या कह्यात देतात; मात्र यापुढे कार्यालयाने कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.

New Driving License Rules 2024 : ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी ‘आर्.टी.ओ.’ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही !

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन अनुज्ञप्तीसंदर्भात (‘ड्रायव्हिंग लायसन्स’संदर्भात) काही मोठे पालट केले आहेत. १ जूनपासून हे नवीन नियम लागू होणार असून यांतर्गत जनतेला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (‘आर्.टी.ओ.’त) जावे लागणार नाही.

पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील वाहनधारकांना नियमांचे उल्लंघन न करता आली दंडाची पावती !

नियमांचे उल्लंघन न करता दंडाची पावती कशी येते ? असे झाले तर लोकांचा नवीन तंत्रज्ञानावर कसा विश्वास बसेल ? यंत्रणेमध्ये त्रुटी असतील, तर त्या अगोदरच का शोधल्या नाहीत ?

वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी ! – सुराज्य अभियान

शिरस्त्राण, ‘सीट बेल्ट’ नसेल किंवा वाहनाला काळी काच बसवली असेल किंवा मद्य पिऊन वाहन चालवल्यास ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे डोळ्यांना घातक असलेल्या प्रकाशाचे दिवे वाहनांना लावणार्‍यांवरही पोलिसांनी तितक्याच तत्परतेने कारवाई करावी.

अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह ९ जणांना अटक !

उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे.

खासगी बसचालकांची तिकीट दरात वाढ !

प्रतिवर्षी सुट्यांमध्ये, तसेच सणांच्या कालावधीत ही समस्या उद्भवते. यावर ठोस उपाययोजना करायला हवी. नियमांचे उल्लंघन करणार्‍या खासगी बसचालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

प्रवेशबंदीच्या ठिकाणी रिक्शाचालकांकडून रिक्शा उभ्या !

याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागही उत्तरदायी !

पी.एम्.पी.च्या प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ !

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पी.एम्.पी.) वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ झाल्याने तिकीट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नात ७८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.