खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !
अवैध वाहतूकप्रकरणी ३१ सहस्र ५७४ वाहने दोषी !
मुंबई – नियमबाह्य अधिक भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करणार्या २२३ खासगी ट्रॅव्हल्सवर राज्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अवैध प्रवासी वाहतूकप्रकरणी ३१ सहस्र ५७४ खासगी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीद्वारे परिवहन विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.
याविषयी श्री. अभिषेक मुरुकटे म्हणाले, ‘‘सण-उत्सव, शैक्षणिक संस्थांची उन्हाळ्याची सुटी आदी कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून नियमबाह्य तिकीटदर आकारला जातो. सर्वसामान्यांच्या होणार्या आर्थिक लुटीच्या विरोधात १८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी सुराज्य अभियानाकडून परिवहन विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. या वेळी सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या परिवहन आयुक्तांची भेट घेऊन या आर्थिक लूटमारीची पुराव्यानिशी माहितीही दिली होती. यानंतर सातत्याने सुराज्य अभियान या विरोधात आंदोलने, तक्रार, निवेदने आदी माध्यमातून खासगी टॅ्रव्हल्सचे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यरत आहे. १० एप्रिल २०२३ या दिवशी सुराज्य अभियानाकडून या प्रकरणी गृहमंत्र्यांकडेही लेखी तक्रार करण्यात आली होती. ’’
१६ जिल्ह्यांतील परिवहन अधिकार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारवाईची मागणी !
खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूटमार रोखावी, यासाठी सुराज्य अभियानाकडून जळगाव, पेण, सातारा, कराड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे (पश्चिम), कल्याण, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांतील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अधिक तिकीटदर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाईची मागणी आम्ही केली होती.
सुराज्य अभियानाच्या अन्य मागण्या !
या मागण्याही आम्ही महाराष्ट्र शासन आणि परिवहन विभाग यांच्याकडे केल्या असल्याची माहिती श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली. |
सुराज्य अभियानाचा लढा !
राज्याच्या परिवहन आयुक्तांशी शिष्टमंडळाच्या वतीने भेट, गृहमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्याकडे तक्रार, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार, राज्यांतील १६ परिवहन अधिकार्यांशी भेट घेऊन कारवाईची मागणी, राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाद्वारे कारवाईची मागणी आणि जनजागृती आदी विविध माध्यमांतून सुराज्य अभियानाकडून खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूटमार रोखण्यासाठी सातत्याने सनदशीर मार्गाने लढा चालू आहे, अशी माहिती श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली.