महिला पोलिसावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा नोंद

जिथे महिला पोलीसच असुरक्षित असतील, तिथे सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल ?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर येथील बसगाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिकटवले नामांतर न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी

तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ६ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथे जाणार्‍या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटवले.

कोरोना काळातील वीजदेयके माफ करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात भव्य वाहन मोर्चा

कोरोना काळातील वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी येथे भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये २५० हून अधिक रिक्शा, २०० हून अधिक ट्रक आणि खासगी गाड्या सहभागी झाल्या होत्या.

पुणे येथील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या भावावर धर्मांधांचे आक्रमण

माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलतभाऊ शेखर पारगे यांच्या डोणजे (ता. हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर ५ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता कोयत्याने आक्रमण करण्यात आले.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या ६४ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका श्रीमती नंदिनी जोशी (वय ८१ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

शेतकर्‍यांच्या लाभाच्या विधेयकाला राजकारणासाठी विरोध केला जात आहे ! – भाजप नेत्यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ  ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला.

वारगाव येथे गांजाविक्री करणारा कह्यात

सिंधुदुर्ग जिल्हा आता अवैध मद्यासह अमली पदार्थांचेही ठिकाण बनत आहे, असे म्हटल्यास चुकीचे होईल का ?

पूजा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आमदार एलिना साल्ढाणा आणि चर्चचे सदस्य यांचा शासनावर दबाव

शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा अन् सांकवाळ येथील ‘पॅरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) यांनी शासनावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे.

कुडाळ येथे दीड लाख रुपयांच्या गुटख्यासह ४ जण पोलिसांच्या कह्यात

भाजीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीचे बिंग ४ जानेवारीला रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. या वेळी पोलिसांनी चौघांना कह्यात घेतले आहे.