नैराश्यामुळे बँक कर्मचार्‍याची खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या !

वडील, पत्नी आणि आई या तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहिवडी (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात आग 

दहिवडी येथील नगरपंचायत कार्यालयास आग लागली यात लाकडी सामान आणि धारिका, विद्युत् साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

सातारा वाठार स्टेशन येथील आठवडा बाजार बंदचा आदेश असूनही भरवला बाजार !

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास याचे दायित्व कुणावर ? जनतेला शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षापद्धत अवलंबणेच आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

बाळ बोठे यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेले आरोपी बाळ बोठे यांना नगरच्या पोलिसांनी अटक केली होती.

नगर येथील व्यापारी गौतम हिरण हत्याप्रकरणी ५ आरोपींना अटक

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले असून संदीप मुरलीधर हांडे, जुनेद उपाख्य जावेद बाबु शेख यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील कोविड रुग्णालयातील रुग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची रुग्णांची तक्रार

भोसरी येथील महानगरपालिकेच्या नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरसह राज्यातील ८ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा

राज्यातील एकूण ८ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील मंदिराचा समावेश आहे.

कालकुंद्रीकर कुटुंबियांकडून ज्ञानदीप वाचनालयास सनातनने प्रकाशित केलेले, तसेच अन्य ग्रंथ भेट !

श्री. दीपक कालकुंद्रीकर आणि सौ. देवकी कालकुंद्रीकर यांच्या विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन् त्यांचा भाचा सनातनचा साधक कु. ईशान महेश कडणे याच्या ६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले १० ग्रंथ अन् इतर ग्रंथ भेट देण्यात आले.

१४ गावांच्या पाणीप्रश्‍नासाठी जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू ! – संजय पवार, शिवसेना

गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा ही १४ गावांची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे चालवण्यात येते. वाढत्या थकबाकीमुळे योजनेतील ग्रामपंचायतींना पाणीपट्टी भरा; अन्यथा नळजोडणी बंद करू, अशी नोटीस कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

पुणे येथील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय

शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.