
नगर – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले असून संदीप मुरलीधर हांडे, जुनेद उपाख्य जावेद बाबु शेख यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी ४ आरोपी नाशिकचे आहेत. अटक करण्यात आलेल्या श्रीरामपूरच्या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने पुन्हा त्यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ केली आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
१ मार्च या दिवशी बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सर्व आरोपींना घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात उपस्थित करण्यात आले असून तपास अधिकारी तथा श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तपासामध्ये आरोपीकडून गौतम हिरण यांचा भ्रमणभाष, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली व्हॅन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !