सातारा जिल्ह्यात बेरोजगारी आणि गरिबीतून ३ युवकांची आत्महत्या !

परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. आत्मबळ साधनेनेच निर्माण होते. धर्मशिक्षणामुळे साधनेचे महत्त्व मनावर बिंबते. शासनाने आता तरी शालेय शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करावा, ही अपेक्षा आहे.

नरवणे (जिल्हा सातारा) येथे वाळू उपशाच्या वादातून २ चुलत भावांचा मृत्यू !

वाळू उपशाच्या कारणावरून माण तालुक्यातील नरवणे गावातील २ चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये २ चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्गातील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पांडे-खानापूर (जिल्हा सातारा) सीमेलगत शेतात टाकलेल्या मळीने विहिरीचे पाणी होणार दूषित

पांडे-खानापूर सीमेलगत दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची शेतभूमी आहे. त्यांच्या शेजारी संतोष घाटे यांची शेतभूमी आहे. घाटे यांनी शेतात १० ते १२ ट्रॅक्टर मळी टाकली आहे.

पुण्यातील शिवाजी मार्केटला लागलेल्या आगीत २५ दुकाने जळून खाक !

पुणे येथील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. त्यानंतर १ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

वाई (जिल्हा सातारा) येथे बाजार समितीवर शेतकर्‍यांचा मोर्चा

१० सहस्र रुपयांंपुढे हळदीची बोली काढावी, तसेच लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी वाई बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे केली. या वेळी ‘तातडीने व्यापार्‍यांची बैठक घेऊन हळदीचे लिलाव घेऊ’, असे आश्‍वासन पिसाळ यांनी शेतकर्‍यांना दिले.

सातारा येथे स्वच्छतेची ऐशीतैशी !

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्‍याचा ढीग लावण्यात आला आहे.

उत्तर कोपर्डे (जिल्हा सातारा) येथील खासगी सावकारी करणार्‍यास अटक

अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले.

सातारा येथील यवतेश्‍वर-कास रस्त्यावर सापडली मानवी कवटी आणि अस्थी !

निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीजजोडणी तोडल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेना आक्रमक !

खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.