कराड येथे धुरांडी कोसळून घरांची लाखो रुपयांची हानी

बारा डबरी परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या बायोडेट असोसिएशनच्या जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची अनुमाने ३०० फूट उंचीची धुरांडी वादळी वार्‍यात कोसळली.

निधन वार्ता

ईश्‍वरपूर येथील सनातनच्या साधिका इंदुमती बजरंग कदम यांचे यजमान बजरंग बापुसो कदम (वय ५८ वर्षे) यांचे २५ एप्रिल या दिवशी हृदयविकाराने निधन झाले.

जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा ! – बाळासाहेब पाटील 

बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी  नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.

जेवढी सेवा तेवढेच शुल्क आकारण्याची सातारा जिल्हा पालक संघाची मागणी !

जेवढी सेवा तेवढेच शुल्क या मागणीवर सातारा जिल्हा पालक संघ ठाम असल्याने शिक्षण विभागाने पालक संघाकडून कल दिल्यास खासगी शिक्षण क्षेत्रातील मनमानी कारभाराला चाप लागणार आहे, असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे. 

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांची पाठ !

काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्‍या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरकडून जादा आकारलेली रक्कम परत देण्याची तयारी !

पोलिसांच्या कारवाईत ‘ज्यांच्याकडून जादा रक्कम घेतली आहे, त्यांना ती परत करू’, अशी भूमिका हेल्थ केअर सेंटरने घेतली. त्यानुसार घेतलेली जादा रक्कम परत घेण्यासाठी नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरवर लोकांनी गर्दी केली.

कांदिवली (मुंबई) येथे श्रीरामनवमी ते हनुमान जयंती सप्ताहानिमित्त महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

या वेळी व्याख्यान ऐकतांना महिलांनी ‘आपणही स्वरक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे’, असे वाटत असल्याचे सांगितले आणि याविषयी ७ दिवसांचा एक नियमित वर्ग घेण्याची विनंती केली.

निधन वार्ता

कोयना वसाहतीमधील सनातनच्या साधिका श्रीमती रूपा मारूति पाटील यांचे अल्पशा आजाराने (वय ५९ वर्षे) २१ एप्रिलला दु. २.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुली, २ जावई, नात आणि नातू असा परिवार आहे.

भारतीय जनता पक्षाचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख ओंकार शुक्ल यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तू आणि रुग्णालयात फळे वाटप

श्री. ओंकार शुक्ल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या, तसेच विविध लोकप्रतिनिधी यांनीही आवर्जून शुभेच्छा दिल्या.

मुंबईतील मरोळ परिसरात भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

या ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नव्हता. अनेकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते.