मुंबई येथील उच्चपदस्थ शहा यांनी स्वीकारले जैन मुनीत्व !

बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

येळंबघाट (जिल्हा बीड) येथे कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे सामाजिक अंतरांचे पालन होत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागले.

रेमडेसिविर इंजेक्शन चोरणार्‍या अफरोज खान याने मृताचे ३६ सहस्र रुपये लाटल्याचा पोलिसांना संशय !

१५ एप्रिल या दिवशी जालना येथील जिल्हा रुग्णालयात कचरू मानसिंग पिंपराळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याजवळील ३६ सहस्र रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, भ्रमणभाष चोरीला गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते. पिंपराळे यांचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला होता.

१० वर्षे पोलीस पाटलांच्या प्रतीक्षेत रेठरे बुद्रुक (सातारा) ग्रामस्थ !

रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. १८ सहस्रांहून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव पोलीस पाटील नसल्यामुळे खोळंबले आहे.

फरीदाबाद (हरियाणा) येथे रामनवमी आणि हनुमान जयंती यानिमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

रामनवमीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे नुकतेच ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले.

निधन वार्ता

तानाजीनगर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. वैशाली कुलकर्णी यांचे जावई योगेश दिलीप कुलकर्णी (वय ४२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झाले.

संचारबंदीत नियम मोडणार्‍यांकडून १८ लाख रुपयांचा दंड वसूल !

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू केली आहे, मात्र शहरात संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. शिवाजीनगर येथील जनवाडी येथे अरुण कदम चौकात बंदीच्या वेळेतही दुकाने चालू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोल्हापूर शहरात गारांचा वर्षाव

अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.

लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद !

कोरोना प्रतिबंधक लस संपल्यामुळे २८ एप्रिल या दिवशी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे अनिश्‍चित कालावधीसाठी बंद झाली आहेत. ज्या केंद्रांमध्ये कोवॅक्सिनचा साठा आहे, त्याच केंद्रांवर लसीकरण काही प्रमाणात चालू आहे. लसीचा साठा उपलब्ध होण्याविषयी अनिश्‍चितता आहे.

इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्.आय.डी.सी.मधील वाय अ‍ॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला.