मुंबईतील मरोळ परिसरात भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यशासनाने कोरोनाविषयक नियम कडक केले असतांनाही २५ एप्रिल या दिवशी अंधेरी येथील मरोळ भाजीबाजारात भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नव्हता. अनेकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते.