
पुरंदर (पुणे) – सरकारने ठरवलेल्या रकमेपेक्षा सिटी स्कॅनिंगसाठी जादा रक्कम घेणार्या पुरंदर येथील नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरवर पुरंदर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या कारवाईत ‘ज्यांच्याकडून जादा रक्कम घेतली आहे, त्यांना ती परत करू’, अशी भूमिका हेल्थ केअर सेंटरने घेतली. त्यानुसार घेतलेली जादा रक्कम परत घेण्यासाठी नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरवर लोकांनी गर्दी केली.
प्रत्यक्षात रक्कम जादा घेतांना त्याची पावतीही काही ग्राहकांना दिली नाही. ज्यांना पावती दिली आहे, त्यांनाच जादा घेतलेली रक्कम परत देण्यात येत आहे. याचप्रमाणे ज्यांना पावती दिली नाही, त्यांची नावे नोंद करून घेत त्यांना पुन्हा संपर्क करतो, असेही केअर सेंटरकडून सांगण्यात आले आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न