रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी प्रशासन आणि शासन कटीबद्ध ! –  जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.

बारसू (राजापूर) येथील आंदोलन तुर्तास स्थगित : सरकार आंदोलकांशी चर्चा करणार !

येथील आंदोलन ३ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. ‘पुढील ३ दिवसांमध्ये प्रकल्पाचे माती सर्वेक्षण थांबले नाही, तर पुन्हा आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलक काशिनाथ गोरले यांनी दिली.

रत्नागिरी येथे ३० एप्रिलला पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे व्याख्यान

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या तेजस्वी-ओजस्वी, धगधगत्या वाणीतून देव, देश आणि धर्म समजण्यासाठी सर्वांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

अल्पवयीय मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा

राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. 

शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस

कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या हानीविषयी हानी टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांचे  निर्बिजीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार : आंदोलक कह्यात !

सर्वेक्षणासाठी येणारे अधिकारी आणि पोलीस यांच्या गाड्यांसमोर आंदोलक महिला आडव्या झोपल्याने प्रश्‍न निर्माण झाला होता. ‘सर्वेक्षण थांबवले जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही’, असा पवित्रा या महिलांनी घेतला.

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होणार ! – पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २ पथदिव्यांचे वीजदेयक शून्य होणार आहे.

४ सहस्र शेळ्या-मेंढ्यांची बोटीतून वाहतूक : १६ जणांना केली अटक

बोटीत असलेल्या खलाशांकडून सीमा शुल्क पथकाला समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने १६ जणांना अटक करण्यात आली आहे.