चिपळूण येथे ‘एकल वापर’ प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या १० व्यावसायिकांवर कारवाई

चिपळूण येथील बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने येथील नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशवी वापरणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.

बारसू (राजापूर) परिसरात जमावबंदी असतांनाही ग्रामस्थांनी एकत्रित होऊन केला विरोध !

प्रशासकीय अधिकार्‍यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली; मात्र या वेळी ’ग्रामपंचातीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालेला असतांना प्रकल्प का करताय ?’, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी अधिकार्‍यांना विचारण्यात आला.

कोकणाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’ची हवामान विभागाची चेतावणी !

राज्यातील बहुतांश भागांत कडक उन्हाळा असून अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे. अतितापमान, पाऊस अन् वाढती आर्द्रता प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकणात हा प्रकार अधिक होत आहे.

बारसू (राजापूर) येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘क्रूड ऑईल’ रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या पाणीपातळीत झाली घट

प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणार्‍या हवामान पालटास अल निनो असे म्हणतात. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानपालटाला कारणीभूत ठरतेय.

बालविवाह होत असल्यास प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन !

राज्यात अक्षय्य तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते.

कोकणात ८ ठिकाणी उभ्या रहाणार समुद्रकुटी (बीच शॅक्स)

कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘बीच शॅक्स’ उभारण्यात येणार आहेत. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील.

२५ एप्रिल ते १० मे या कालावधीत प्रतिदिन ५ घंटे परशुराम घाट वाहतुकीस बंद !

परशुराम घाटाच्या ५.४० किलोमीटर लांबीपैकी १.२० किलोमीटरचा भाग दुर्गम असल्यामुळे या भागाचे चौपदरीकरण करणे अवघड आहे त्यामुळे हा घाट बंद ठेवावा अशी मागणी ठेकेदाराने जिल्हाधिऱ्यांकडे केली होती.

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले !

सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले.