मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पावसाळ्याच्या आरंभीच म्हणजे जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.