राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.१.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर

लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याने राजपूत करणीसेनेकडून ‘बिग बॉस १४’ मालिका बंद करण्याची मागणी

येथील राजपूत करणी सेनेने ‘बिग बॉस १४’ ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या मालिकेत एजाज खान आणि पवित्र पुनिया हे एकमेकांवर प्रेम करत असून त्यांची आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात येत आहेत.