लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याने राजपूत करणीसेनेकडून ‘बिग बॉस १४’ मालिका बंद करण्याची मागणी

देशपातळीवर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात जागृती होत असूनही मालिकांतून अशा प्रकारे चित्रण करून हिंदूंच्या भावना दुखावणार्‍यांना हिंदूंनी एकजुटीने विरोध केला पाहिजे !

मुंबई – येथील राजपूत करणी सेनेने ‘बिग बॉस १४’ ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या मालिकेत एजाज खान आणि पवित्र पुनिया हे एकमेकांवर प्रेम करत असून त्यांची आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात येत आहेत. यात मुसलमान नायक आणि हिंदु नायिका दाखवल्याने हे थेट लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे. या संदर्भात लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याची मागणी करत या ‘रियॅलिटी शो’वर बंदी घालण्याची मागणी वरील हिंदुत्वनिष्ठ संघटनेने केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केले आहे. ‘शो मेकर्स’ आणि या मालिकेचा ‘होस्ट’ सलमान खान यावर ‘अडल्ट कन्टेट’ आणि लव्ह जिहाद यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.