राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.१.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

जे करणी सेनेला कळते ते पोलिसांना कळत नाही कि पैसे घेऊन दुर्लक्ष करतात ?

मालाड (पश्‍चिम) येथील एका इमारतीमध्ये आवश्यक ती अनुमती न घेता चालू असलेले अश्‍लील वेब सिरीजचे चित्रीकरण करणी सेनेने बंद पाडले. या प्रकरणी करणी सेनेकडून मालवणी पोलीस ठाण्यात तक्रारही प्रविष्ट करण्यात आली आहे, तसेच  निर्मात्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणी सेनेने केली आहे.


असे पदाधिकारी असलेली काँग्रेस देशाचे काय भले करणार ?

जालौन (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांनी छेडछाड केल्याच्या प्रकरणी त्यांच्याच पक्षातील महिला सचिव आणि अन्य युवती यांनी मिळून त्यांना भर रस्त्यात चपलांनी मारहाण केली.


भारतातील हिंदू हे धर्मासाठी काही करत नाहीत. या उलट धर्मांध जगभर जागृत असतात !

पुणे येथील गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना परदेशांतून भ्रमणभाषवर धमक्या दिल्या जात आहेत. ४.११.२०२० च्या मध्यरात्री शिवीगाळ करून धमकीचा भ्रमणभाष पोलंड (युरोप) येथून आला. याविषयी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यापूर्वी पाकिस्तानातील क्रमांकावरून स्वामी यांना धमक्या देण्यात आल्या होत्या.