रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट

शिवसेना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकात जाधव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

पुणे येथे रेल्वे स्टेशन मास्तरांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन 

रेल्वेचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, यांसह विविध मागण्यांसाठी  रेल्वे स्टेशन मास्तरांनी आंदोलन केले .

रेल्वेच्या अवैध तिकीटविक्री प्रकरणी तीन दलालांना अटक

मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्‍या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.

हुबळी मार्गे जाणार्‍या १९ रेल्वे गाड्या रहित

नैऋत्य रेल्वे विभागातील असणार्‍या हुबळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने वेगवेगळ्या दिवशी एकूण १९ रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.

हुबळी येथे होत आहे जगातील सर्वांत मोठा रेल्वे फलाट; युद्धपातळीवर काम चालू

हुबळी रेल्वे फलाट जगातील सर्वांत अधिक लांबीचा फलाट होणार

भारताने बनवली जगातली पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ !

भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ गाडी बनवली आहे. जगातील कोणत्याही देशात अद्याप अशाप्रकारची विशेष रेल्वे बनवण्यात आलेली नाही. या रेल्वेमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असतील, तसेच अत्याधुनिक उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक तैनात असेल.

मिरज-पुणे रेल्वेमार्गाची रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा यांच्याकडून पहाणी !

पॅसेंजर गाड्या चालू करण्याची रेल्वे प्रशासनाची सिद्धता असून महाराष्ट्र शासनाने अनुमती दिल्यास त्या चालू करू

देहली ते मेरठ मार्गावरील भुयारी मार्गासाठी पुन्हा चिनी आस्थापनाला कंत्राट

आत्मनिर्भर भारता’ची घोषणा करणार्‍या सरकारने ‘शत्रूराष्ट्राच्या आस्थापनाला कंत्राट देण्याची वेळ का आली ? यातून ‘भारताचा चीनविरोध किती पोकळ आहे आणि चीनच्या वस्तू, तंत्रज्ञानाविना भारत प्रगती करू शकत नाही’, असा संदेश जातो, हे लज्जास्पद !

चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे काम !

तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.

सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे प्रारंभ

शेतकर्‍यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच वरिष्ठांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे चालू झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.