११ फेब्रुवारीपासून दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस चालू
दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून दादर येथून, तर १४ फेब्रुवारीपासून म्हैसुरू येथून चालू होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर आणि दक्षिण भारतात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक चालू करण्यात येत आहे.