‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

असे किती धर्मांध अशा आतंकवादी संघटनांत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि किती जणांना सरकारने अटक करून कारागृहात टाकले, याचीही माहिती जनतेला कळली पाहिजे !

भ्रष्ट कर्मचार्‍यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – मद्रास उच्च न्यायालय

भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍यांना पदोन्नती देणार्‍यांवरही कारवाई केली पाहिजे ! भारतात आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला असून भ्रष्ट लोकांनाच मान दिला जात आहे, हेच भ्रष्ट कर्मचार्‍यांना पदोन्नती दिल्याचे प्रकरण दर्शवते !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २.१.२०२२

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी २६ अधिकारी दोषी

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढल्याने चीनच्या १ कोटीहून अधिक लोकसंख्या असणार्‍या शीआन शहरामध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या वाढत्या संसर्गासाठी चीनने त्याच्या २६ अधिकार्‍यांना दोषी ठरवले असून त्यांना लवकरच शिक्षा करण्यात येणार आहे.

लुधियानातील न्यायालयात बाँबस्फोट करणारा पंजाब पोलीस दलातील बडतर्फ हवालदार गगनदीप सिंग असल्याचे उघड

लुधियाना येथील न्यायालयात झालेला बाँबस्फोट गगनदीप सिंग याने घडवला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली. गगनदीप हा माजी पोलीस हवालदार असून त्याला अमली पदार्थांच्या तस्करीमुळे पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

नगर येथील लाचप्रकरणी भूमीअभिलेख अधिकारी महिलेस ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा !

नगर येथील एका शेतकर्‍याने भूमीअभिलेख कार्यालयात भूमीची ५ तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणीचे शुल्क भरले होते….

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याद्वारे पहिली शिक्षा !

‘लव्ह जिहाद’ हे थोतांड आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि उदारमतवादी चमूला आता काय म्हणायचे आहे ? आता न्यायालयांचेही ‘भगवेकरण’ झाले आहे, असे या चमूने म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

परीक्षा घेण्याचीच परीक्षा !

परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक ! 

म्यानमारच्या माजी प्रमुख आंग सांग स्यू की यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

म्यानमारच्या नेत्या तथा नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सांग स्यू की यांना एका स्थानिक न्यायालयाने ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. स्यू की यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, तसेच भावना भडकावणे, या गुन्ह्यांखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला जिवंत जाळले !

भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?