१२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला २० वर्षांचा सश्रम कारावास

मुख्याध्यापक विपिन साह

गोपाळगंज (बिहार) – येथे वर्ष २०१९ मध्ये एका खासगी शाळेत विपिन साह नावाच्या मुख्याध्यापकाला एका १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. साह यांनी या विद्यार्थिनीला स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण केले होते.

संपादकीय भूमिका

मुख्याध्यापक असतांना असे कृत्य करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !