पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा करू, ज्यामुळे इतरांना धडा मिळेल !

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे इराणला आश्‍वासन

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लाभार अजित डोवाल

नवी देहली – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्यानंतर १५ इस्लामी देशांनी त्यास विरोध केला. यात इराणचाही समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन आमिर अब्दुल्लाहियन भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांची भेट घेतल्यावर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लाभार अजित डोवाल यांनी हुसैन आमिर अब्दुल्लाहियन यांना ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांना कठेर शिक्षा दिली जाईल. त्यातून इतरांना धडा मिळेल’, असे म्हटल्याचे इराणकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. हुसैन आमिर अब्दुल्लाहियन यांनी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली.

संपादकीय भूमिका

  • भारतात प्रतिदिन हिंदूंच्या देवता, धर्म, श्रद्धास्थाने यांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमांतून अवमान होत असतांना केंद्र सरकार त्याच्या संदर्भात काहीच करत नाही. त्यांनाही कठोर शिक्षा करावी, जेणेकडून इतरांना धडा मिळेल, असे देशातील १०० कोटी हिंदूंना वाटते !
  • इस्लामी देशांत हिंदू, त्यांची मंदिरे, घरे आदींवर आक्रमणे होतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार केला जातो, त्या संदर्भातही भारत सरकारने इस्लामी देशांवर दबाव आणून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !