नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाद्री थॉमस आणि नन सेफी यांना जामीन संमत

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाद्री थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. २७ मार्च १९९२ या दिवशी नन अभया यांची सेंट पायस कॉन्व्हेंटमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी डिसेंबर २०२० या दिवशी न्यायालयाने पाद्री थॉमस आणि नन सेफी यांनी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला या दोघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी या दोघांना जामीन संमत करण्यात आला. त्यांना राज्यातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच दोघांना पुढील ६ मास प्रत्येक शनिवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.