ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे १२ वर्षीय हिंदु मुलाला गळ्यात तुळशीची माळ असल्याने फुटबॉल सामना खेळण्यापासून रोखले !

माळ काढल्यास खेळण्याची अनुमती देण्याची सवलत धर्माभिमानी हिंदु मुलाने नाकारली !

श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये काढण्यात आली मिरवणूक !

कलम ३७० हटवल्यानंतर हिंदूंनी प्रथमच श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात लाल चौकात मिरवणूक काढली. या वेळी सुरक्षादलांकडून संरक्षण देण्यात आले होते.

उत्तरप्रदेशातील ‘सुलतानपूर’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘कुश भवनपूर’ करण्याचा प्रस्ताव

उत्तरप्रदेश महसूल मंडळाकडून राज्यातील सुलतानपूर जिल्ह्याचे नाव पालटून श्रीरामांचे पुत्र कुश यांच्यावरून ‘कुश भवनपूर’ असे ठेवण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाची अभिनंदनीय कृती ! अशाच प्रकारचे अभ्यासक्रम देशातील अन्य विश्‍वविद्यालयांनीही चालू करणे आवश्यक. अशाने खर्‍या अर्थाने नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होईल ! – संपादक

वडोदरा (गुजरात) येथील १०८ मंदिरांवरील ध्वनीक्षेपकांवरून भाविकांना ऐकवली जात आहे आरती आणि हनुमान चालिसा !

वडोदरा शहरातील १०८ मंदिरांमध्ये प्रतिदिन २ वेळा आरती आणि हनुमान चालिसा ध्वनीक्षेपकांवरून ऐकवली जात आहे. स्थानिक संघटना ‘मिशन राम सेतू’कडून हा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या प्रयत्नांमुळे दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेरील हनुमान मंदिरावरील कारवाईला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती !

दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पुरातन मारुति मंदिर अनधिकृत असल्याचे घोषित करून रेल्वे प्रशासनाकडून ते पाडण्यात येणार होते. त्याविषयी ३१ जुलै या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्‍वस्तांना नोटीस पाठवून ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्याची अनुमती हिंदु आणि शीख समाजाला नव्हती.

जम्मू-काश्मीरच्या ५ जिल्ह्यांत ७ ठिकाणी काश्मिरी हिंदूंसाठी २ सहस्र ७४४ सदनिका बांधणार !

काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्‍न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देऊ नये ! – कर्नाटक शासनाचा आदेश

कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असा आदेश प्रत्येक राज्यशासनाने काढला पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत !

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वगळून हिंदु राजांचा इतिहास शिकवला जाणार !

आता प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रमातही अशा प्रकारचा पालट करण्यासाठी भाजप शासित राज्यांमध्ये प्रयत्न व्हावा, असेच हिंदूंना वाटते !