जम्मू-काश्मीरच्या ५ जिल्ह्यांत ७ ठिकाणी काश्मिरी हिंदूंसाठी २ सहस्र ७४४ सदनिका बांधणार !

रोजगारासाठी ३ सहस्र ८४१ काश्मिरी हिंदू खोर्‍यामध्ये परतले !

काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्‍न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय परिषदेने वर्ष २०१५ च्या पंतप्रधान विकास पॅकेजच्या अंतर्गत काश्मीर खोर्‍यातील विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी २ सहस्र ७४४ सदनिका उभारण्यासाठी ५ जिल्ह्यांमधील ७ ठिकाणी भूमी हस्तांतरित करण्याला संमती दिली आहे.  या सदनिकांसाठी ३५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने संसदेत सांगितले की, पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजच्या अंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी ३ सहस्र ८४१ काश्मिरी हिंदू खोर्‍यामध्ये परतले आहेत.