गूगलकडून ‘गॉड ब्लेस यू’चे ‘भगवान आपका भला करे’ असे योग्य भाषांतर !

‘गूगल’ या ‘सर्चइंजिन’च्या ‘गूगल ट्रान्सलेटर’ या संकेतस्थळावर इंग्रजीमधील ‘गॉड ब्लेस यू’ या वाक्याचे हिंदीमध्ये भाषांतर करतांना ‘अस्सलाम अलैकुम’ असे उर्दूमध्ये भाषांतर दाखवण्यात येत होते. याचा प्रसार धर्मांधांकडून होत असल्याचे लक्षात आल्यावर धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी सामाजिक माध्यमांतून गूगलकडे याविषयी तक्रार केली.

केरळमध्ये हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ची झाली स्थापना !

‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी वसंतपंचमीला म्हणजेच १६ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या संस्थेची गुरुकृपेने स्थापना केली.

सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांच्यासाठी केंद्र सरकारची नियमावली घोषित !

वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !

उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ४०४, तर काशीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनामुळे कन्हैया कुमार याचे व्याख्यान रहित !

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

३१ वर्षांनंतर उघडण्यात आले श्रीनगरमधील शीतलनाथ मंदिर !

जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.

हिंदु धर्माचा उपहास करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍याला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले !

अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !

मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ! – योगी आदित्यनाथ

महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीला पूर्णपणे हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

‘शरजील उस्मानी याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा !’  

हिंदुद्वेषी शरजील उस्मानीसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदु समाजाला अवमानित करणे, हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे.