दैनिक ‘सनातन प्रभात’चे कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार प्रीतम नाचणकर यांचा ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मान !

‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या शासकीय कामकाजात आढळले ७ सहस्रांहून अधिक किचकट आणि परकीय शब्द !

सरकारने हे परकीय शब्द हटवून त्याजागी स्वकीय शब्दांचा वापर करून भाषाशुद्धीच्या कार्याची परंपरा जोपासावी !

महाराष्‍ट्रात मराठी भाषिकांना दिले जाणार उर्दूचे धडे !

मातृभाषेची दुरवस्‍था असतांना महाराष्‍ट्रात मराठीसह अन्‍य भाषिकांना उर्दूचे धडे कशासाठी ?

महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष १९३७ पासूनचे कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना !

२ वर्षांत कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याचा प्रयत्न ! – नीलेश वडनेरकर, माहिती आणि संशोधन अधिकारी, महाराष्ट्र विधीमंडळ

एस्.टी. महामंडळात ५ सहस्र ३०० नवीन वातानुकूलित इलेक्‍ट्रिक गाड्या येणार !

गाड्या वातानुकूलित असल्‍या, तरी गाड्यांच्‍या तिकिट दरामध्‍ये वाढ करण्‍यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्‍पन्‍न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्‍यात येत आहेत.

प्रमाणपत्रांची पडताळणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्‍यात येणार ! – रणजितसिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्‍ट्र शासन

बोगस क्रीडा प्रमाणपत्रे रोखण्‍यासाठी सरकारकडून उपाययोजना !

विधीमंडळाचे कामकाज करतांना ‘जनतेचे प्रतिनिधी आहोत’, अशी जाणीव हवी !

सहस्रावधी प्रश्‍न प्रलंबित असतांना खरे तर शाळेतील गृहपाठाप्रमाणे नियमितचे कामकाज त्‍याच दिवशी पूर्ण करायचा दंडक लागू करणे आवश्‍यक आहे.

माहीम गडावर अतिक्रमण करणार्‍यांना विनामूल्य सदनिका !

‘मुंबईत अवैध झोपडपट्टी बांधा, विनामूल्य घर मिळवा’, अशी महापालिकेची योजना आहे का ?

सहस्रो आश्वासने प्रलंबित ठेवण्यास उत्तरदायी असलेल्यांना लगेचच कारागृहात टाका !

विधीमंडळात वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी स्वत: उपस्थित केलेल्या शेकडो गंभीर प्रश्नांवर स्वत: मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची वर्षांनुवर्षे पूर्तता होत नाही.

विधीमंडळाच्या अधिवेशनांतील ३ सहस्र २२८ आश्वासने केवळ कागदावरच !

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे चौकशी अहवाल सभागृहात सादरच करण्यात आलेले नाहीत !