नूपुर शर्मा प्रकरणी १५ इस्लामी देशांकडून भारताला विरोध !
हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर त्यांना कतार देशाने आश्रय दिला होता, हे कतारला कसे चालले होते ?, असा प्रश्न भारताने विचारला पाहिजे !
हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर त्यांना कतार देशाने आश्रय दिला होता, हे कतारला कसे चालले होते ?, असा प्रश्न भारताने विचारला पाहिजे !
जनतेकडून मिळालेल्या निधीद्वारे प्रशासनामध्ये चाललेल्या या प्रकारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अधिवक्ता रॉड्रिग्ज यांनी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लाई यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेचे मिरज शहर उपप्रमुख कुबेरसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक ४ येथील सिद्धनाथ वसाहत येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या सर्वच राजकीय पक्षांत विविध विचारांच्या नेत्यांची सरमिसळ झालेली पहायला मिळते. हे नेते पक्षाच्या तत्त्वाने बांधील नसतात, ते सत्ता आणि पद यांसाठी एकवटलेले असतात. सर्वच पक्षांत चालू असलेली ही पक्षांतरे हे त्याचेच लक्षण आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता ‘जनतेच्या भल्यासाठी काम करणारे नेते सध्या किती आहेत ?’ हा अभ्यासाचा विषय ठरेल !
येथील खासदार नवनीत राणा यांना एका भ्रमणभाष क्रमांकावरून त्यांच्या वैयक्तिक दूरभाषवर सातत्याने शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
अडीच वर्षांच्या कालावधीत महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकर्यांच्या समस्या यांसह सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पहाण्यास वेळ नसून हे सरकार स्थानांतरण आणि वसुली यातच मग्न आहे…
शिवानंद द्विवेदी लिखित ‘अमित शहा आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून १६ मे या दिवशी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणा…
औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. प्रत्येक पक्षाचे अजेंडे असतात. त्यावर माझे व्यक्तिगत मत देणे योग्य नाही; मात्र सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही.
श्रीलंकेतील नागरिकांनी प्रत्येक वेळी हिंसाचाराचे पाऊल उचलण्यापेक्षा संकटाला कसे सामोरे जायला हवे, याची पूर्वसिद्धता करायला हवी. सरकारनेही बिघडलेली आर्थिक गणिते सुधारून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरायला हवा. जनतेला दिशा देत संकटांच्या गर्तेतून बाहेर काढल्यास विक्रमसिंघे हे राष्ट्राची पुनर्उभारणी करू शकतील, हे निश्चित !
बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने हत्या होत असतांना देशातील एकही राजकीय पक्ष तोंड उघडत नाही, जे दुसरीकडे राज्यघटनेच्या रक्षणाच्या बाता करत असतात !