नूपुर शर्मा प्रकरणी १५ इस्लामी देशांकडून भारताला विरोध !

नवी देहली – नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत १५ इस्लामी देशांनी विरोध केला आहे. यात कतार, इराण, कुवैत, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, मालदीव, सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मलेशिया आदी देशांचा समावेश आहे.

१. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने शर्मा यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. यापूर्वी मालदीव देशातील विरोधी पक्षाने यासंदर्भात एक प्रस्ताव आणला होता; मात्र तो संमत करण्यात आला नाही. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाने काहीच न बोलणे, हे आश्‍चर्यकारक असल्याचे मालदीवचे विरोधी पक्ष नेते अ‍ॅडम शरीफ उमर यांनी म्हटले होते.

२. बांगलादेशमधील शेख हसिना सरकारने या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही. बांगलादेशमध्ये मागील वर्षी दुर्गापूजेच्या वेळी मंडपांची तोडफोड झाली होती, तेव्हा शेख हसिना यांनी विरोध केला होता. ‘भारतामध्ये असे काही होता कामा नये, ज्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंवर त्याचा परिणाम होईल’, असे बांगलादेशने दुर्गापूजेसंदर्भातील गोंधळावरून म्हटले होते.

संपादकीय भूमिका 

  • हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर त्यांना कतार देशाने आश्रय दिला होता, हे कतारला कसे चालले होते ?, असा प्रश्‍न भारताने विचारला पाहिजे !
  • मलेशियाने भारतातील जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याला लपवून ठेवले आहे, हे मलेशिला कसे चालते ?, हेही भारताने विचारले पाहिजे !
  • पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे हिंदूंचा वंशसंहार होत आहे, त्यावर भारत त्यांना कधी जाब विचारणार ?
  • आखाती देशांमध्ये हिंदूंना त्याच्या धार्मिक कृती करण्यावर बंदी घातली जाते, याविषयी भारत त्यांना कधी जाब विचारणार आहे ?