देवस्‍थानच्‍या विश्‍वस्‍त निवडीविषयी राजकीय पक्षाने हस्‍तक्षेप करू नये !

मंदिर समितीवर स्‍थानिक लोकांची नेमणूक नक्‍कीच व्‍हावी; पण ती गुरव समाजातूनच व्‍हावी आणि किमान ५० टक्‍के विश्‍वस्‍त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत. त्‍यामुळे या निवडीविषयी आक्षेप असल्‍याचे महासंघाकडून सांगण्‍यात आले.

(म्हणे) ‘समान नागरी कायदा’ मुसलमानांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो !’ – मौलाना अरशद मदनी

समान नागरी कायदा झाल्यास मुसलमानांना ४ विवाह करता येणार नाहीत, अल्पसंख्यांक म्हणत वेगळ्या सुविधा लाटता येणार नाहीत, यामुळे मदनी थयथयाट करत आहेत !

दीपा चौहान यांचा बोलावता धनी कोण ? – विजय चौगुले, जिल्हाप्रमुख, शिवसेना

ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी दीपा चौहान या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपातून गणेश नाईक यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे…

#Exclusive : शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक ! – डॉ. जी.बी. हरीश, प्रसिद्ध लेखक, बेंगळुरू

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. आज भाग २.

काँग्रेसकडून गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून कर्नाटक विधानभवनाचे शुद्धीकरण !

इतर वेळी गंगाजल आणि गोमूत्र यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या काँग्रेसला आता या गोष्टी पवित्र कशा काय वाटू लागल्या ? गोहत्या बंदीचे समर्थन न करणार्‍या पुरो(अधो)गामी काँग्रेसला गोमूत्राचे महत्त्व कसे काय समजू लागले ?

सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !

अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदामंत्री !

केंद्रशासनाने कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात पालट केला असून त्यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. अर्जुन राम मेघवाल हे आता नवे कायदामंत्री असतील.

(म्हणे) ‘मुसलमानाला उपमुख्यमंत्री करा !’ – कर्नाटक वक्फ बोर्डाची काँग्रेसकडे मागणी !

मुसलमानांनी काँग्रेसकडे फाळणीची मागणीही अशाच पद्धतीने केली होती आणि काँग्रेसने सत्तेसाठी ती मान्य केली होती ! आताही काँग्रेसने या मागण्या मान्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईत उपस्थित !

विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे.

थायलंडमधील निवडणुकीत सैन्यविरोधी पक्षांना लक्षणीय यश, तरीही सत्तेच्या किल्ल्या सैन्याच्याच हाती !

थायलंडमधील राजकीय पक्षांमध्ये सैन्य समर्थित आणि सैन्यविरोधी असे २ गट आहेत. गेल्या एक दशकापासून थायलंडवर सैन्य समर्थित सरकारची सत्ता होती.