चीनच्या विनंतीवरून रशियाने पाकिस्तानला पुरवले कच्चे तेल !

रशिया आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जाते; मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो, तर प्रत्येक जण स्वहित पहात असतात, हे या घटनेतून लक्षात येते. हे लक्षात घेऊन भारताने सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आवश्यक !

बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण

बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !

अमेरिकेत प्रथमच ‘हिंदु अमेरिकी शिखर संमेलना’चे आयोजन

अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार

कर्नाटकात रा.स्व. संघाला देण्यात आलेल्या शेकडो एकर भूमींची अवलोकन करणार ! – काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव

काँग्रेसचा हिंदुद्वेष. काँग्रेसने आतापर्यंत वक्फ आणि मुसलमानांच्या अन्य संघटना यांच्यावर सुविधांची जी खैरात केली, त्याविषयी काँग्रेसवाल्यांना काय म्हणायचे आहे ?

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र !

एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्‍यत्‍व कुणी दिले ? सदस्‍यत्‍व देणार्‍यांचीही चौकशी होेणे आवश्‍यक !

(म्हणे) ‘मी औरंगजेबासमवेत आहे !’ – आमदार अबू आझमी

‘धर्मांध मुसलमान औरंगजेबाचे अनुकरण करणार असतील, तर आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे अशा प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध व्हावे’, असे हिंदूंना वाटले, तर चूक काय ?

देवस्‍थानच्‍या विश्‍वस्‍त निवडीविषयी राजकीय पक्षाने हस्‍तक्षेप करू नये !

मंदिर समितीवर स्‍थानिक लोकांची नेमणूक नक्‍कीच व्‍हावी; पण ती गुरव समाजातूनच व्‍हावी आणि किमान ५० टक्‍के विश्‍वस्‍त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत. त्‍यामुळे या निवडीविषयी आक्षेप असल्‍याचे महासंघाकडून सांगण्‍यात आले.

(म्हणे) ‘समान नागरी कायदा’ मुसलमानांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो !’ – मौलाना अरशद मदनी

समान नागरी कायदा झाल्यास मुसलमानांना ४ विवाह करता येणार नाहीत, अल्पसंख्यांक म्हणत वेगळ्या सुविधा लाटता येणार नाहीत, यामुळे मदनी थयथयाट करत आहेत !

दीपा चौहान यांचा बोलावता धनी कोण ? – विजय चौगुले, जिल्हाप्रमुख, शिवसेना

ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी दीपा चौहान या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपातून गणेश नाईक यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे…

#Exclusive : शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक ! – डॉ. जी.बी. हरीश, प्रसिद्ध लेखक, बेंगळुरू

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. आज भाग २.