शिवसेना आमदारांच्‍या अपात्रतेविषयी १४ सप्‍टेंबर या दिवशी विधीमंडळात सुनावणी !

विधानसभेचे अध्‍यक्ष डॉ. राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्‍या ४०, तर उद्धव ठाकरे गटाच्‍या १४ आमदारांचा यामध्‍ये समावेश आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार घालू !

असे आहे तर जनतेने लोकप्रतिनिधींना त्‍यांच्‍या कर्तव्‍याची जाणीव करून द्यावी लागेल !

गत ५ मासांत छत्रपती संभाजीनगरच्‍या ११ आमदारांकडून ९ कोटी रुपयांच्‍या आमदार निधीचा व्‍यय !

शासनाकडून लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्‍यासाठी निधी उपलब्‍ध होत असतांना विकासकामांना गती पकडणे अपेक्षित आहे. अन्‍यथा निधी निरुपयोगी ठरेल.

अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाने विधान परिषदेच्‍या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्‍याकडे केली आहे.

मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समाविष्ट करू नये !

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी असतांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी. प्रवर्गात घुसवण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाले, तर पुढे होणार्‍या परिणामांना सरकार उत्तरदायी राहील – ओ.बी.सी. संघटना, सिंधदुर्ग

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

वर्ष २०२१ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात कौशल्य विकास घोटाळ्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. २५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये चंद्रबाबू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत.

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचा सनातन हिंदुविरोधी खरा चेहरा समोर आला आहे ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांकडून सनातन हिंदु धर्मावर खालच्या पातळीवर येऊन टीका होत आहे. ‘इंडिया’ आघाडीत सनातन हिंदु धर्माला कुठेच स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

सप्टेंबरमध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता ! – ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर  

सांगली, कोल्हापूर यांसह कर्नाटक आणि तमिळनाडू येथे नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, स्फोटक घटनाही या काळात घडू शकतात.

मराठवाडा मुक्‍तीसंग्रामाच्‍या संघर्षाची गाथा देशभरात पोचवली जाणार !

मराठवाडा मुक्‍तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांमध्‍ये सर्वांना सहभागी होता येण्‍यासाठी २६ जानेवारी २०२४ पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात यावे, अशा सूचना या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्‍या.

‘वर्सोवा-विरार सी-लिंक’, ‘मेट्रो ११’ यांसाठी जपान साहाय्य करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

६ दिवसांच्या जपान दौर्‍यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे २६ ऑगस्ट या दिवशी मुंबईत आगमन झाले. या वेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.