वातावरणातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी !  

उष्माघात होवू नये; म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना ‘गॉगल्स’, छत्री किंवा टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली नेहमी समवेत ठेवावी.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आगामी भीषण काळाच्या संदर्भात वर्तवलेली भविष्यवाणी पुढे देत आहे.

बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

गेल्या वर्षापेक्षा यावर्षीचे आंबा उत्पादन केवळ १२ ते १५ टक्के असल्याचे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सांगितले आहे. तसा अहवाल त्यांनी तात्काळ शासनाकडे सादर करावा.

संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आंबा हानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील ! –  रत्नागिरी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने बागायतदारांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. या विदारक परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

गोवा : खोतीगाव, गावडोंगरी परिसरातील डोंगरांना आग !

गेल्या मासात म्हादई अभयारण्याला लागलेली आग थांबवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर आता खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील डोंगरांनाही आग लागली. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

सतत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती !

सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे.

अमेरिकेतील चक्रीवादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी हे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळामुळे असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली.

वनक्षेत्रांना लागलेल्या आगीमुळे ४ कोटी १८ लाख चौरसमीटर भूमीवर विपरीत परिणाम ! – वनमंत्री विश्वजीत राणे

फोंडा तालुक्यात भोम-अडकोण येथील डोंगराला आग लागली आहे. फोंडा अग्नीशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

भविष्यात जगात भेडसवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा भारताला फटका बसणार !

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे भूकंपामुळे १९ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील हिंदुकुश भागात २१ मार्चच्या सायंकाळी ६.५ रिश्तर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के पाकिस्तान आणि भारतातील देहलीसह काही शहरांमध्ये जाणवले.